पाहातो मी ती सकाळ संध्या,
दिवसाचे ते उगवणे मावळणे.
काहीतरी सांगत आहे ती मला,
सतत मला हे असेच वाटते.
सकाळची ती कोवळी किरणे,
सांगतात तू ऊठ आता.
आहे तुला मिळाली एक अजून संधी,
आहे तुला मिळाली एक अजून संधी,
नवीन जीवन हे जगाया.
हळूच चढत जातो पारा,
जशी जशी ही दुपार होते.
सांगते ती मला जणू की,
जीवनात नेहमी सुख नसते.
द्याव्या लागतात कठोर परीक्षा,
फळ ज्याचे नेहमीच गोड नसते.
हळू हळू हा दिवस सरतो,
मावळू लागतो तो संध्याकाळी,
सांगते ती संध्या मला हे,
कठोर तपस्चर्ये अंती मिळते यशाची सावली.
रात्र बोलते हळूच कानाशी,
दमला असशील तू आता.
घे जरा तू थोड़ी विश्रांति,
जमव उद्या साठी नवीन शक्ति.
~~~~ Composed sometime in the past ~~~~
No comments:
Post a Comment